मारेगावात सुकाणू समितीचं रस्ता रोको आंदोलन यशस्वी
वाहतूक प्रभावित, आंदोलनकर्त्यांना केलं स्थानबद्ध
ज्योतिबा पोटे, मारेगाव: सुकाणू समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने मारेगाव शहरातील जिजाऊ चौकाजवळ सोमवारी दुपारी 12 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. त्यामुले मारेगाव पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करित आंदोलनकर्त्याना रोखले आणि सर्वांना स्थानबद्ध केले होते. त्यानंतर काही वेळानं त्यांची सुटका देखील केली.
सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, कृषीमालाला हमी भाव द्यावा, कृषिपंपासाठी 24 तास वीज उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
(हे पण वाचा: वणीत सुकाणू समितीचं आंदोलन यशस्वी)
या आंदोलनात सुकाणू समितीचे प्रमोदराव कडकडीत, बंडी गोळे, पुंडलिक ढुमणे, अनंत मांडवकर, रुपेश ढोके, किशोर बोटे, अनामिक बोटे, सभापती शीतल पोटे, श्रीकांत तांबेकर, श्रीकांत सांबजवार, विशाल किन्हेकर, आकाश बदकी, तसंच परिसरातील शेतकरी आणि सुकाणू समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.