लेखा विभागाच्या हलगर्जीपणामुळे सेवा निवृत्त कर्मचारी वेतनापासून वंचित
पेन्शनर्स असोसिएशनतर्फे प्रसिद्धी पत्रक काढून लेखा विभागावर आरोप
जब्बार चीनी, वणी: पंचायत समिती झरी येथील लेखा विभागाच्या हलगर्जी पणामुळे सेवा निवृत्त कर्मचारी वेतनापसुन वंचित असण्याचा आरोप यवतमाळ जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन कडून करण्यात आला आहे. जिल्हा परिषदकडून सेवा निवृत्ती वेतनासदंर्भात मार्च 2020 व एप्रिल 2020 या दोन महिन्याचे वेतना करिता निधी उपलब्ध होवुनसूध्दा पं.स. झरी येथील सेवानिवृत्त कर्मचारी वेतनापासून वंचित आहे. असा आरोप पेन्शनर्स असोसिएशनतर्फे प्रसिद्धी पत्रक काढून करण्यात आला आहे.
पेन्शनर्स असोसिएशन ने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की पेन्शन का मिळाले नाही याबाब चौकशी केली असता बॅकेत पाठविण्यात आलेल्या धनादेश व यादी यामध्ये जवळपास 60 ते 62 हजारांची तफावत असल्याचे संबंधीत बॅकेकडून समजते. दोन महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे निवृत्ती वेतन धारकांस आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. औषधोपचारासाठी पैसा नसल्याने जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यापूर्वी सुध्दा लेखा विभागाच्या अशा अडेलतट्टु धोरणामुहे सेवानिवृत्त कर्मचा-यांना उपोषणास बसावे लागले होते. शासनाच्या पोर्टलवर तक्रार सुध्दा दाखल करावी लागली. याबाबत लेखा विभागाने गांभीर्याने घेतले नसून सेवा निवृत्त कर्मचा-यांना त्रास देण्याचे धोरण आखले आहे. याबाबत संघटनेने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही बाब प्रभारी गटविकास अधिकार्यांना सुद्धा माहित आहे.
सदर प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी करून दोषी कर्मचा-यांविरूध्द कडक कार्यवाही करण्याची मागणी यवतमाळ जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन अध्यक्ष प्रकाश दामले, विभागिय संघटक प्रकाश गाडे व तालुका सचिव एम. सी. येरगुडे व किशोर इंगोले यांनी केली आहे.