बोगस शेतकऱ्यांना शोधण्याचे सहाय्यक निबंधकाचे आदेश

कापूस खरेदी घोटाळा: तालुका लेखापरीक्षक करणार चौकशी

0

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील वणी कापूस संकलन केंद्रावर शेतकऱ्यांच्या सातबारा वर खाजगी व्यापाऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री केल्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक, सह. संस्था वणी यांनी दिले आहे. तालुका लेखापरीक्षक एम. व्ही. मरकाम बोगस शेतकऱ्यांची चौकशी करणार आहे.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) कडून 27 नोव्हे. 2019 पासून 19 मार्च 2020 पर्यंत वणी व शिंदोला संकलन केंद्रावर रेकॉर्ड 6 लाख क्विंटल एवढी प्रचंड कापूस खरेदी केली गेली. शेतकऱ्यांच्या सातबारावर पीक नोंदी प्रमाणे तसेच अधिकतम 40 क्विंटलपर्यंत कापूस हमी भावाने खरेदी करण्याचे नियम असताना वणी व शिंदोला केंद्रावर बाजार समिती व ग्रेडरच्या मनमर्जीने चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, व आदीलाबाद येथील शेतकरी व व्यापाऱ्यांचे ट्रक व मॅटाडोरने आलेले कापूस सरसकट खरेदी करण्यात आले. जिल्ह्यातील एकमात्र वणी संकलन केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी होऊनही सीसीआय, पणन महासंघ, बाजार समिती व जिल्हा उप निबंधक कार्यालयाने डोळेझाक केली.

स्टॉक फोटो

20 एप्रिल नंतर नोंदणी करणाऱ्या 9 हजार शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या सातबारावर व्यापाऱ्यांनीच नोंदणी केल्याचे उघड झाले आहे. व्यापाऱ्यांचा कापूस गाड्या लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची सुद्दा खमंग चर्चा खरेदी विक्री क्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे सीसीआयची वणी केंद्रावरची कापूस खरेदी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

वणी बाजार समिती अंतर्गत झालेल्या सर्व व्यवहार, सीसीआय ग्रेडर, जिनिंग मालक यांची सीआयडी किंवा सीबीआय चौकशी झाल्याड मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.