सावधान…. विना मास्क फिराल तर बसेल खिसाला चोट

वणीत 119 जणांना ठोठावला दंड... प्रशासनाची संयुक्त कारवाई

0

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी 16 जून रोजी विना मास्क लावता शहरात फिरणाऱ्या एकूण 119 जणांवर कारवाई करीत दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई नगर परिषद, महसूल विभाग व पोलीस विभागाद्वारे संयुक्तपणे करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोना पसरू नये म्हणून सुजाण नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे असे वारंवार सांगितल्या जात आहे. परंतु नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मंगळवारी सकाळपासून नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर, तहसीलदार श्याम धानमणे व पोलीस यांनी संयुक्त कारवाईला सुरूवात केली. सुरवातीला गांधी चौक नंतर दीपक चौपाटी व दुपारी टिळक चौकात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.

यामध्ये महसूल विभागाद्वारे 44, नगर परिषदेद्वारे 25 तर पोलीस विभागाद्वारे 50 जणांवर कारवाई करण्यात आली. अशी एकूण 119 जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 23800 रुपये वसूल करण्यात आले आहे. यानंतर कुणीही विना मास्क लावता बाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.