मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांची आत्महत्या

नरसाळा येथे शेतक-यांची आत्महत्या, तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे एका 55 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळपासू घेऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र कोरोनामुळे आर्थिक संकट ओढावल्याने ही आत्महत्या असल्याचे गावात बोलले जात आहे. ज्या दिवशी मुलाचा वाढदिवस होता त्याच दिवशी मुलाला वडिलांच्या आत्महत्येची घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली.

रामदास गोविंदा कडुकर (55) रा. नरसाळा असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. मृतका कडे 5 एकर शेजमीन आहे. त्यांचा मुलगा सलून व्यवसायात होता. मात्र सध्या कोरोनामुळे सलून व्यवसाय बंद असल्याने तो शेतीमध्ये काम करायचा. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास रामदास यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर कर्ज होते. तसेच कोरोनामुळे त्यांच्या मुलाचा व्यवसायही बंद होता. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून तर त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला नसेल असा अंदाज गावात बांधला जातोय. मृतकाच्या मागे एक मुलगा, एक विवाहित मुलगी पत्नी असा आप्तपरिवार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.