39 रिपोर्ट प्राप्त… वणीकरांसाठी गूड न्यूज !

अद्याप 20 रिपोर्ट येणे बाकी. विलगीकरण करणे सुरूच

0

जब्बार चीनी, वणी: वणीतून 59 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 39 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यातील 37 रिपोर्ट निगेटिव्ह तर 2 रिपोर्ट पॉजिटिव्ह आहे. याआधी वणीतील नागपूर येथे असलेले 3 रुग्ण पॉजिटिव्ह आहे. त्यामुळे आता पॉजिटिव्हची संख्या 5 आहे.

सोमवारपर्यंत प्रशासनाने 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. तर मंगळवारी आणखी 16 जणांचे स्वॅब यवतमाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या स्वॅबची संख्या 59 झाली होती. यातील 39 रिपोर्ट आले असून त्यात 2 पॉजिटिव्ह व उर्वरित 37 लोक निगेटिव्ह आहेत. तर 20 रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोशल मीडियावरून अफवा पसरवू नका – प्रशासन
दरम्यान सोशल मीडियावरून विविध अफवांना उत आला आहे. याबाबत प्रशासनाने अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. शिवाय वॉट्सऍपवरून अफवा पसरवणे हा गुन्हा असून अशा लोकांवर कार्यवाही केली जाऊ शकते. त्यामुळे अशा अफवांपासून सावध राहा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.