अवैध दारू व गॅस सिलेंडर विक्री करणारे झाले गावपुढारी

प्रामाणिक नेत्यांची प्रतिमा होत आहे मलीन

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठे गाव व बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन येथे अवैध दारू व गॅस सिलेंडर विक्री करणारे गावपुढारी झाल्याने गावातील इतर प्रामाणिक नेत्यांची प्रतिमा मलीन होत आहे. मुकूटबन येथील लोकसंख्या १२ हजार जवळपास असून १५ सदस्य असलेली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. गावात मोठी सिमेंट फॅक्टरीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तर परिसरात छोटे मोठे उद्योग सुद्धा सुरू असल्याने मुकूटबनला वेगळेच स्वरूप आले आहे.

मुकूटबन येथे अवैध दारू व गॅस सिलेंडर विक्रेता गावपुढारी झाले असून स्वतःच्या दुकानदारी वाचविण्याकरिता मोठ्या पक्षाच्या राजकीय लोकप्रतिनिधींच्या नावाचा वापर करून दुकानदारी वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुकूटबन मध्ये अवैध गॅस सिलेंडर ८७० रुपयात घेऊन जनतेला १२०० ते १३०० रुपयात विक्री करून महिन्याकाठी लाखो रुपये कमवीत आहे. अवैध गॅस विक्री करणारा पुढारी स्वतःला खूप मोठा समजायला लागला असून उठसुठ सदर मोठ्या पक्ष्याच्या लोकप्रतिनिधीच्या नावाचे वापर करीत असल्याचे दिसत आहे. लोकप्रतिनधीचे नाव प्रचारकरिता की दुकानदारी वाचविण्याकरिता अशी चर्चा मतदार करीत आहे.

दुसरा पुढारी म्हणून वावरणारा याने तर चक्क अडेगाव येथे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय केला आहे. त्याने स्वतःचा जवळील मित्र कायर येथील एक तरुण या दोघांना पार्टनर बनविले व अडेगाव येथील विनोद नामक मुलाच्या घरी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. विनोद याला ५०० रुपये रोजीने कामावर ठेऊन मुकूटबन येथून स्वतःच्या चारचाकी व दुचाकीने दारूच्या पेट्या पोहचवीत होता तर कधी कधी मुकूटबन येथील एका तरुणाच्या हस्ते अडेगाव येथे दारू पोहचविल्या जात होती.

अडेगावचा विनोद नामक तरुण हा गावात दारू विक्री तर चंद्रपूर जिल्ह्यातील कान्हाळगाव येथे दररोज ५ पेट्या दारू तस्करी करून आज स्वतःला मोठा पुढारी म्हणून समजणार्याला पैसे देत होता. तसेच अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी लावून देतो म्हणून लाखो रुपयाने तरुणांना गंडविल्याची सुद्धा चर्चा तालुक्यात सुरू आहे.

मोठ्या पक्षाचे मोठे पुढारी समजून शासकीय कार्यालयात तक्रारी करणे अधिकारी कर्मचारी यांच्यावर लोकप्रतिनिधीच्या नावाचा वापर करून दबाव टाकणे असे प्रकार सुरू आहे ज्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांना त्रास वाढला असुन अश्या लोकांमुळे स्वच्छ प्रतिमा असलेल्या लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन होत आहे. व अनेक कर्मचारी व अधिकारी सुद्धा सदर पक्षाच्या विरोधात चर्चा करीत आहे.

वैयक्तिक मतभेद मुळे शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी देऊन ही प्रतिष्ठित जनतेसोबत संबंध खराब करीत आहे.  ज्यामुळे शेकडो सुज्ञ व पक्षाच्या अगदी जवळचे मतदार खराब करण्याचे काम सुरू आहे. अश्या कृत्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत याचा परिणाम भोगाव लागणार असल्याची भाषा मतदार करीत आहे. दोन्ही गावपुढार्यांना राजकारणाची एबीसीडी व समाजकारणाची बाराखडी समजत नसून फक्त मतदार खराब करण्याचे काम करीत आहे.

दोन्ही पुढारी लोकप्रतिनिधीला आमच्या मागे खूप मतदार असल्याचे भासवून स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वतःचे घर व कुटुंब सांभाळू शकत नाही ते सुद्धा सदर लोकप्रतिनिधी सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयन्त करीत आहे. अधिकारी किंवा जनतेत धड बोलता येत नाही तर कुणाला आपलं नाव व सही मारता येत नाही असे गाव पुढारी झाले तर पक्ष किती पुढे जाईल हे एक कोडेच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.