शेतक-यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, भाजपची निवेदनातून मागणी
बियाणे न उगवल्याने शेतक-यांचे नुकसान, भाजप आक्रमक
जब्बार चीनी, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात काही शेतक-यांच्या शेतात पेरलेले कपाशी व सोयाबिनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत भाजप आक्रमक झाली असून नुकसान झालेल्या शेतक-यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी दिनांक 2 जुलै रोजी निवेदन देण्यात आले. जर या मागणीकडे दुर्लक्ष केले तर शेतक-यांचे मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिला.
खरिप हंगामात वणी विधान सभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी संकल्प या कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले मात्र ते उगविलेच नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पावसाअभावी कपाशी व सोयाबीन पिंकाची उगवण झाली नाही. या संदर्भात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुषी विभागाकडुन तातडीने पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना बियाणे रासायनिक खते व पेरणी मजुरी त्वरित देण्यात यावी. अशी मागणी भाजप वणी विधासभा तर्फे करण्यात आली आहे.
सदर नुकसान भरपाई संकल्प, महाबिज इ. कंपन्यांकडून वसुल करण्यात यावी व शेतकऱ्यांना दिलासा दावा. अन्यथा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनात द्वारे दिला आहे.
सदर निवेदन भारतीय जनता पार्टी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार नेतृत्वात देण्यात आले. यावेळी दिनकर पावडे जिल्हा सरचिटणीस, विजय पिदुरकर जिल्हा उपाध्यक्ष, तारेंद्र बोर्डे नगराध्यक्ष, संजय पिंपळशेंडे सभापती, रवि बेलुरकर माजी शहर अध्यक्ष, गजानन विधाते तालुका अध्यक्ष, श्रीकांत पोटदुखे शहर अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते.