भाजयुमोतर्फे सुमित चोरडिया यांचा वाढदिवस साजरा

तारेंद्र बोर्डे यांच्यातर्फे इम्युनिटी बुस्टरचे वाटप

0

जब्बार चीनी, वणी: भाजप प्रणित भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित चोरडिया यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त अर्सेनिक अल्बम 30 या इम्युनिटी बुस्टरचे वाटप करण्यात आले. याशिवाय गरजूंना मास्क व सॅनिटायजचे वाटपही करण्यात आले. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यातर्फे या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सध्या कोरोनामुळे वणीचे भाजयुमोचे शहर अध्यक्ष व युवा नेते सुमित चोरडिया यांचा अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वणीतील प्रतिबंधीत क्षेत्र असलेल्या वरोरा रोड, ढुमेनगर व सेवानगर या भागात अरसेनिक अल्बम 30 या रोग प्रतिकारक शक्ती वाढवणा-या औषधींच्या 2 हजार बॉटलचे वाटप करण्यात आले. तसेच परिसरातील गरजूंना सॅनिटायझर व मास्कचेही वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नगरसेवक नीलेश होले, नितीन चहाणकर, मंगेश झाडे, महेंद्र राजूरकर, निखिल खाडे, मनिष गायकवाड यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.