मार्कीच्या नागरिकांचा झरी पंचायत समितीवर मोर्चा
वार्ड क्र. 3 कडे वर्षानुवर्ष जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप
देव येवले, मुकुटबन: मार्की (बु.) येथील वार्ड क्र. 3 मधील नागरिकांनी शनिवारी ‘रस्ता द्या रस्ता’ म्हणत झरी पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी यांना विविध समस्येचं निवेदन दिलं. तसंच 15 दिवसांत समस्या सोडवल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
मार्की गावातील वार्ड क्र. 3 हा भाग विकासापासून वंचित आहे. इथे रस्ते व नाल्याची गंभीर समस्या आहे. सांडपाण्याच्या प्रश्नामुळे शेजा-यांचे आपसात भांडण होत आहे. तसंच आरोग्याची समस्या देखील निर्माण झाली आहे. अनेक वर्षापासुन या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यानं या वार्डाचा विकास खुंटला आहे असा आरोप करत तिथल्या नागरिकांनी गटविकास अधिका-यांना निवेदन दिलं आहे.
(नांदेड-हावडा एक्सप्रेसला मिळाला वणी स्टॉप)
गटविकास अधिकारी यांनी स्वतः पाहणी करून त्या समस्या सोडवाव्या. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मार्की येथील नागरिकांनी निवेदनात दिला आहे . त्यावेळी आजाद उदकवार, रुपेश मुळे, अमोल जगनाळे, विनोद कुरमेलवार, प्रशांत झाडे, संतोष गद्दलवार, सूरज तंटावार, किशोर कावाडे,सुरेश बलकी, गोलु भट, सूरज उदकवार यांच्यासह अनेक महिला व नागरिक उपस्थित होत.