धक्कादायक… वणीत कोरोनाचा आणखी 1 रुग्ण

घर व व्यापारी प्रतिष्ठान सिल करण्याची प्रक्रिया सुरू

0

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचे आणखी 1 रुग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अद्याप प्रशासनाने अधिकृतरित्या दुजोरा दिला नसला तरी पॉजिटिव्ह असलेल्या व्यक्तीचे व्यापारी प्रतिष्ठान व घर सिल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती ही आधीच्या साखळीमधून नसून ही नवीन साखळी आहे. त्या व्यक्तीला कोरोना सदृष्य लक्षणं आढळल्याने त्या व्यक्तीने त्याच्या पत्नीसह नागपूर गाठले. तिथे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. यात 1 व्यक्तीची चाचणी पॉजिटिव्ह आल्याची माहिती आहे.

ही माहिती मिळताच वणीमध्ये प्रशासकीय सूत्रे हलण्यास सुरूवात झाली. सदर व्यक्तीचे व्यापारी प्रतिष्ठान व घर सिल करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तिथे काम करणा-या व्यक्तींनाही लवकरच कॉरन्टाईन केले जाऊ शकते.

अद्याप या बाबत प्रशासनाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नसल्याने याला दुजोरा मिळालेला नाही. मात्र प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. जर ही व्यक्ती पॉजिटिव्ह असेल तर वणीतील कोरोना रुग्णांची संख्या ही 8 होणार व नवीन साखळीही तयार होणार.
( ही बातमी माहिती येताच वेळोवेळी अपडेट केली जाईल)

हे पण वाचा…. झरीत कोरोनाचा शिरकाव…

झरी तालुुक्यात कोरोनाचा शिरकाव, तालुक्यात खळबळ

Leave A Reply

Your email address will not be published.