स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तरुणाची आत्महत्या

विष पिऊन संपवले जीवन, येनक येथील घटना

0

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील येनक येथील एका युवकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैशिष्ठ नत्थू पंडिले (27) असे मृतकाचे नाव आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर युवक हा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी काही काळ पुणे येथे राहत होता. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे तो गावाला आला होता. शुक्रवारी दुपारी राहत्या घरी त्याने कीटकनाशक प्राशन केले. उपचारासाठी चंद्रपूरला दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान (दि.4) शनिवारी त्याचे निधन झाले.

आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. येनक येथे सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. एका होतकरू युवकाच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.