एक फेक फेसबुक फ्रेन्ड रिक्वेस्ट पडली भारी….

प्रेमात बुडालेल्या आईसह मुलीलाही गमवावा लागला जीव

0

क्राईम मास्टर गोगो, गाजियाबाद: प्रिया एक दिवस मोबाईल वर फेसबुकवर असताना अचानक तिला एका पुरुषाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकार केली. मात्र तिला माहिती नव्हते की ती फ्रेंन्ड रिक्वेस्ट नसून साक्षात यमराजाचीच रिक्वेस्ट असेल. तिच्या केवळ एक छोट्याशा चुकीमुळे फक्त तिलाच नाही तर तिच्या मुलीलाही यमराजाकडे जावे लागले. ही घटना उत्तर प्रदेशातील असून आई व मुलीची हत्या केल्याप्रकरणी मेरठ जनपद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

प्रिया ही गाजियाबाद जनपद येथील मोदीनगर येथील रहिवाशी होती. तिचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या दोनच वर्षानंतर तिचा घटस्फोट झाला. तिला पतिपासून एक मुलगी होती. काही दिवसांआधी ती घरातील काम आटपून फेसबुकवर टाईमपास करत होती. अचानक तिला अमित गुर्जर नावाने एका पुरुषाची रिक्वेस्ट आली. तिने प्रोफाईल चेक करून फ्रेन्ड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. रिक्वेस्ट एक्सेप्ट करताच तिच्या मॅसेंजरवर लगेच “हाय… जे 1 झाले का?” असा मॅसेज आला? सुरूवातीला तर तिने त्या मॅसेजकडे दुर्लक्ष केले. त्याने त्याला पुन्हा जेवली का? ब्रश केला का? आज आंघोळ केली का? असे नसल्या चौकशा करणारे मॅसेज केले. मात्र तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.

दुस-या दिवशी अमितने छान पैकी फुलांचा गुच्छ असलेला व त्यासोबत एक सुविचार असलेला फोटो टाकून प्रियाला गुड मॉर्निंग केले. मॅसेज चांगला बघून तिनेही त्याला गुड मॉर्निंग म्हणत रिप्लाय दिला. त्या दिवशी त्यांनी मॅसेन्जरवर फक्त जेवण झाले की नाही, यासोबतच काय खाल्ले? काय पिले? काय नाही खाल्ले इथपर्यंत गप्पा मारल्यात. रात्री अमितने प्रियाला “प्रिया” उल्लेख असलेली शायरी पाठवत गुड नाईट केले. यावर प्रियानेही स्माईली इमोजी पाठवत गुडनाईट केले.

प्रिया पण अनेक वर्षांपासून एकटी होती. तिला ही कुणीतरी मन मोकळे करायला पुरुष हवाच होता. दुस-या दिवशीपासून त्यानंतर त्या दोघांमध्ये सारखे बोलणे सुरू झाले. फेसबुकवरून जेवण झाले का ? इथून सुरू झालेला प्रवास आता बाहेर डिनरला चलते का? इथपर्यंत पोहोचला. एक दिवस त्याने तिला थेट डिनरसाठी इनवाईट केले. तिनेही त्याला होकार दिला. दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले व भेटण्याचे ठिकाण ठरवले.

संध्याकाळी ते एका रेस्टॉरन्टमध्ये भेटले. ती भेट त्यांची चांगलीच ठरली. पुढे “तुम्हे अपना बनाने की कसम खाई है” म्हणत तो प्रियाच्या प्रेमात पडला. दुसरीकडे “नजरे मिली धडका मेरी धडकन ने कहा लव्ह यु राजा” म्हणत ती देखील त्याच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये गुटर्गु सुरू झाले. तिने अमितला तिच्याबद्दलचे सर्व पूर्व  आयुष्य सांगितले. एक मुलगी असल्याचे ही त्याने तिला मनमोकळे पणाने सांगितले. अमितने त्याचा खुशीखुशीत स्वीकार केला. मात्र….. हे प्रकरण वाटत होते तितके सोपे नव्हते….

प्रियाने कुटुंब चालवण्यासाठी परिसरातच ब्युटीपार्लर टाकले होते. तिची चंचल नावाची एक मैत्रिणही होती.  ती ज्या घरी राहायची त्या घरची ती  घरमालकीन होती. प्रिया आणि चंचलमध्ये चांगली मैत्री होती. प्रियाने फेसबुकवर भेटलेल्या हिरोबद्दल तिला माहिती दिली होती. चंचल देखील मैत्रिणीला कुणीतरी हिरो भेटल्याने खूश होती. दरम्यान अमितने तिला व तिच्या मुलीला स्वत:च्या घरी राहण्यास बोलावले. त्या दोघी मायलेकी आता अमितकडे राहण्यास निघून गेल्या. आता फोनवरचे त्यांचे गुटर्गू प्रत्यक्षात रंगू लागले. दिवस निघत होते. मात्र म्हणतात ना सत्य किती ही लपवले तरी एक दिवस समोर येतेच. एक दिवस प्रियाला अशी काही माहिती मिळाली कि तिच्या पायाखालची वाळू सरकली. पहिली गोष्ट म्हणजे तो अमित नसून शमशाद असल्याचे तिला कळले व दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे आधीपासून लग्न झालेले होते.

अनेक दिवसांपासून प्रियाचा चंचलला कॉल आला नव्हता. आधी त्या दोघीही नेहमी बोलायच्या. मात्र ती दुसरीकडे राहायला गेली तेव्हापासून तिचा संपर्क कमी झाला होता. चंचल देखील ती खूश असल्याने तिला जास्त डिस्टर्ब  करत नव्हती. पण एक दिवस चंचलने प्रियाला कॉल केला. मात्र प्रियाच्या कॉलवर चंचलला केवळ कोविड 19 से रक्षा किजीये हिच टेप ऐकायला मिळाली. तिचा कॉल काही लागलाच नाही. दुस-या दिवशीही तिला तिच कोवीड 19 ची टेप ऐकावी लागली. अखेर तिने प्रियाच्या ब्युटीपार्लरला भेट दिली तर ब्युटी पार्लर बंद होते. तिने अमितला कॉल केला मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिलीत. चंचलने प्रियाचा शोध घेतला मात्र तिला शोध लागला नाही. आता मात्र चंचलला संशय आला. तिने थेट पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार केली. मात्र पोलिसांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.

अमित बाबत माहिती काढताच चंचललाही तो अमित नसून शमशाद असल्याची माहिती मिळाली. तिने लगेच याबाबत हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली. कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठून एकच दांगूड घातला. प्रकरण वाढत आहे बघून पोलीस देखील नमते झाले. भूडबराल या गावी आली. तिथे त्यांनी शमशादला विचारणा केली असता त्याने “कोन प्रिया कैसी प्रिया” अशी शोलेतील सुरमा भोपालीसारखी भूमिका घेतली मात्र पोलिसांनीही संघम बनत त्याला बाजीराव दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने दोघीही मायलेकीचा खून केल्याची माहिती दिली. त्याने त्या दोघांचेही प्रेत खून करून अंगणात पुरून ठेवले होते.

असे उलगडले हत्येचे गुढ…
शमशादने खूनाची कबुली दिली. आधी तर शमशादने प्रियापासून आधी लग्न झाल्याचे लपवले होते. पण सत्य एक दिवस उघड होतेच. शमशादने अमित असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे तिला माहिती झाले. त्यानंतर त्याचे आधीच लग्न झाले हे देखील तिला माहिती झाले. त्यावरून त्या दोघांमध्ये सारख्या कुरबुरी वाढत होत्या. प्रियाने त्याला बायकोला सोडण्यास सांगितले होते. मात्र शमशाद तिला केवळ  “तारीख पे ताऱीख” द्यायचा. अखेर यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले व शमशादने प्रिया व तिच्या छोट्या मुलीचा खून केला. याबाबत कुणाला माहिती होऊ नये म्हणून तिचे प्रेत घराच्या अंगणात पुरून ठेवले.

सध्या या प्रकरणी आरोपीने गुन्हा कबूल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहे. केवळ एका फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमुळे दोघींनाही जीव गमवावा लागला. त्यामुळे तुम्हीही अशा फेक आयडीपासून सावध राहा. काळजी घ्या. (सत्य घटनेवर रिक्रिएट स्टोरी)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.