जब्बार चीनी, वणी: एकीकडे तेली फैलात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता ग्रामीण भागातही कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. परवा वणीत 10 रुग्ण सापडल्यानंतर आज शनिवारी वणीत आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही महिला असून यातील एक रुग्ण तेली फैलातील तर दुसरी रुग्ण राजूर येथील आहे. आज दोन रुग्ण आ़ढळल्याने वणीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 38 झाली आहेत.
झरी येथे 3, कुंभा येथे 1 व आता राजूर येथे कोरोनाचे 2 रुग्ण झाले आहेत. आधी केवळ शहरात असणा-या कोरोनाने आता ग्रामीण भागात पाय पसरवण्यास सुरुवात केल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर गेल्या 20 दिवसांपासून तेली फैल प्रतिबंधित क्षेत्र असूनही तिथे दिवसेंदिवस रुग्ण वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आज 36 रिपोर्टपैकी 2 रिपोर्ट पॉजिटिव्ह तर 34 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 183 रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहेत. वणीत कोरोनाचे एकूण 38 रुग्ण आढळले असून त्यातील 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 15 व्यक्ती सध्या ऍक्टिव्ह आहेत. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यातील 12 व्यक्ती वणीतील कोविड केअर सेन्टरमध्ये उपचार घेत असून तीन रुग्णांवर यवतमाळ य़ेथे उपचार सुरू आहे.
(हे पण वाचा: फेसबुकवरून प्रेम, तरुणी घरून पळून निघाली थेट जम्मूला)