दवाखान्यातून बेकायदेशीररित्या औषधींची विक्री ?

वणीतील एका क्लिनिकला प्रशासनाची नोटीस

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील वरोरा रोडवरील एका दवाखान्यातून औषधांची विक्री होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सदर डॉक्टरांना औषध व सौंदर्य प्रसाधन कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. औषधी विक्री करण्याचा अधिकार केवळ मेडिकल स्टोअर्सना आहे. त्यामुळे प्रशासनाकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे.

शहरात वरोरा रोडवर डॉ. एकरे यांचे एकरे क्लिनिक नामक दवाखाना आहे. या दवाखान्यातुन औषधांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती औषध निरीक्षक गोतमारे यांना मिळाली. माहितीनुसार त्यांनी 20 जुलै रोजी सदर दवाखान्यात तपासणी केली असता त्या ठिकाणी ऍलोपॅथी औषधांचा साठा दिसून आला.

या प्रकरणी औषध विभागाने याबाबत डॉक्टरांना नोटीस दिली आहे. त्यानुसार सदर औषधी त्यांनी कुणाकडून खरेदी केली, कोणत्या खरेदी बिलाद्वारे खरेदी केली, औषध कसे प्राप्त झाले, औषधांचा साठा करण्याकरिता कार्यालयाचा परवाना प्राप्त आहे काय? याबाबत नोटीस देऊन विचारणा करण्यात आली आहे. याबाबत योग्य उत्तर न मिळाल्यास औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 व त्या खालील कलम 18 A नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

वणीत असलेल्या होलसेल औषधी विक्रेत्याद्वारे तर हे औषध डॉक्टरांना पोहचविले जात नाही ना? किंवा एखादया परवाना धारक मेडिकल मधून तर औषधी पुरविली जाते काय? असे अनेक प्रश्न या प्रकरणी उपस्थित केले जात आहे. डॉक्टरांना तपासणीचा तर औषध विक्री हा मेडिकल धारकाचा अधिकार आहे. त्यामुळे दवाखान्यातून औषधी विक्री करणे हे बेकायदेशीर ठरते. दरम्यान याचा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वणी बहुगुणीच्या हाती आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.