प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुष्पा चौगुलेने गाठले ध्येय
हालअपेष्टेत शिक्षण घेत मिळवले अद्भूत यश
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: परिस्थिती कितीही प्रतिकूल ही असो फक्त शिक्षणाप्रती असलेली निष्ठा, जिद्द, चिकाटी व इच्छाशक्तीच्या बळावर निश्चितच यश मिळवता येते . हे यश मिळवले पुष्पा चौगुले या विद्यार्थीने. ब्राह्मणवाडा थडी येथील जी. एम. पेठे महाविद्यालयाची ती विद्यार्थी आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत शालांत परीक्षेत 80% गुण मिळवून अन्य विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
पितुछत्र हरवलेली पुष्पा ही विश्रोळी येथे आजीकडे शिक्षणाकरिता राहते. खोदकाम करणारा परिवार, घरी अठराविश्व दारिद्र्यं, घरात शिक्षणाचे कोणतेच वातावरण नाही. शिक्षणाकरिता ब्राम्हणवाडा थडी येथे जायला वाहनाची सोय नाही. अशाही कठीण परिस्थितीत रोज शाळेत 4 किलोमीटर पायी प्रवास, सोबतच शिक्षणाकरिता लागणार खर्च व परिवाराला थोडी फार मदत व्हावी याकरिता सुटीच्या दिवशी शेतात मोलमजुरी करून जिद्द व चिकाटीने परिस्थितीत वर मात करीत यश संपादन केले आहे.
तिच्या या यशाचे कौतुक आणि गौरव करण्याकरिता जिल्हा भाजपा सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष अतुल बनसोड, अतुल दरोकार, मोंटु दाभाडे, उज्वल निमकर यांनी पुष्पाच्या घरी जाऊन तिचा सत्कार करून तिला शैक्षणिक वाटचालीला शुभेच्छा दिल्यात.