संत गाडगे बाबा अम. विद्यापीठाचा अवयवदान संकल्प कार्यक्रम आज १३ ला

विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि आरोग्य विभागाचे आयोजन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा अवयवदान संकल्प कार्यक्रम आज गुरुवारी १३ ऑगस्टरोजी दुपारी दोन वाजता होत आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि आरोग्य विभागाचे हे आयोजन आहे. विद्यापीठाच्या sgbau.live या वेबसाईटवरून हा अवयवदान संकल्प कार्यक्रम ऑनलाइन होईल.

Podar School 2025

कार्यक्रमाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ.राजेश जयपुरकर करतील. मुख्य वक्ता आणि प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम उपस्थीत राहतील. कार्यक्रमाला सहभागी होण्याकरिता https://sgbau.live/NationalServiceScheme या लिंकवर दुपारी 2.00 वा. क्लिक करून सहभागी व्हायचे आहे. असे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्र. संचालक डॉ.राजेश बुरंगे यांनी कळवले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.