मुकुटबन येथील आरसीपीएल सिमेंट कंपनी सील करा
कोरोनाचे 7 रुग्ण आढळल्याने भाजपा तालुका पदाधिकारी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबनयेथील आरसीसीपीएल कंपनीतील रुग्ण कोरोना पोजिटिव्ह निघालेत. मुकुटबनसह परिसरातील जनतेला कोरोना संसर्ग पसरण्याची त्यामुळे भीती वाढली आहे. ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून लोकसंख्या जास्त आहे. हा धोका लक्षात घेता भाजपाने जिल्हाधिकाऱ्यांना कंपनी सील करण्यासाठी निवेदन दिले.
सिमेंट कंपनीत परराज्यातील कामगार आल्यापासून कोरोनाचे 7 रुग्ण आढळले आहे. मुकुटबन येथे हजारो लोकांची रेलचेल कामानिमित्त सुरू असते. त्यामुळे परिसरातील जनतेलासुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंपनीने परराज्यातील येणाऱ्यांना 14 दिवस कोरेनटाईन करण्यात यावे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता सिमेंट कंपनी एक महिन्याकरिता सील करावी. अशा मागण्या भाजपचे तालुका अध्यक्ष सतीश नाकले, सुरेश मानकर, प्रवीण नोमुलवार, मुन्ना बोलेनवार, राजेश्वर गोंडरावार, लता आत्राम, अनिल पोटे, संजय दातरकर आणि बंडू वराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केल्या आहेत.
आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत 15दिवसापूर्वी कोरोनाची लागण होऊन तीन कामगार रुग्ण आढळले होते ज्यामुळे मुकुटबन ग्रामवासी संतप्त झाले होते व सदर सिमेंट कंपनी एक महिण्याकरिता सील करन्याची मागणी केली होती. व दोन दिवसांपूर्वी अजून चार रुग्ण आढळल्याने जनतेत प्रचंड संताप संताप उसळला असून कंपनी एक महिन्याकरिता बंद झालीच पाहिजे असा पवित्रा तालुका भाजपने घेतला आहे.
सिमेंट कंपनीत परप्रांतीय लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उत्तरप्रदेश मध्यप्रदेश बिहार झारखंड व इतर अनेक राज्यातील कामगार खाजगी ट्रॅव्हल्स ने सतत येत आहे. यातील 7 कामगार पोजिटिव्ह निघाले आहे ज्यामुळे कंपनीतील इतर कामगार व मुकुटबन ग्रामवासीयांना कोरोनाचा धोका निर्माण झाला .