झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण व फवारणी किटचे वाटप

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी यांचा उपक्रम

0

सुशील ओझा, झरी: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी झरीजामणी यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व 13 ऑगस्ट रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाची काळजी व कीड व्यवस्थापन याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शेतकरी, मजुरांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

झरीजामणी तालुक्याचे पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. तसेच सभापती व इतर मान्यवर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमातअधिकारी मगर केविके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांनी आभार प्रदर्शन केले .या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी बदकल, मगर केविके, जाधव BTM झरी, तालुका कृषी मित्र नीलेश भोयर, तहसीलदार रामचंद्र खिरेकर सर्व मंडळ अधिकारी व कृषी सहायक, तसेच सर्व कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.