वणी शहर हिरवेगार करण्याच्या उपक्रमाला पुन्हा सुरुवात

27 ऑगस्टपासून सुरू होणार उपक्रमाला सुरूवात

0

रवी ढुमणे, वणी: वणीतील नगर सेवा समितीने शहरातील मुख्य रस्त्यावर झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे. सेवा समितीने आता पुन्हा झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात सिहाचा वाटा असलेले चिखलगावचे सरपंच यांनी या उपक्रमास पुन्हा मदत करणार असल्याचे सांगितले आहे. नगर सेवा समिती वणी द्वारा २७ ऑगस्ट पासून मनिप्रभा टॉवर (नांदेपेरा रोड) जयस्वाल यांचे घरापासून ते बायपास पर्यत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

वणी शहरात नगर सेवा समितीने ‘चला शहर हिरवेगार करू’ असा संकल्प करून मुख्य रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम राबवला. लावलेल्या झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. आज घडीला शहरात जागोजागी ही झाडे बघायला मिळतात.

नगर सेवा समितीचे दिलीप कोरपेनवार यांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबविला होता. शहरातील विविध ठिकाणी नगर सेवा समितीने झाडे लावून ती जगविले आहेत. याच धर्तीवर नव्याने झाडे लावण्याचा निर्धार समितीने केला आहे.

चिखलगावचे सरपंच व नगर सेवा समितीचे आधारस्तंभ सुनिल कातकडे यांच्या हस्ते तसेच वणी न.प.चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच रोडलगत दुतर्फा झुडपे काढणे व लावलेल्या झाडांना वळण आदी बाबी लक्षात घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोलाच्या कार्यात सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यासाठी वाणीकरांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नगर सेवा समितीने केले आहे.

(राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 50 लाखाचे बांधकाम रखडले)

समितीने शहरात लावलेल्या झाडांना दररोज पाणी देण्यासाठी चिखलगावचे सरपंच सुनील कातकडे यांनी मोलाचे कार्य केले आहेत. यावेळी सुद्धा कातकडे नी परत सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.