26 ऑगस्टला मारेगावात प्रहारतर्फे दिव्यांगासाठी ‘चर्चासत्र’

मान्यवरांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुका प्रहार सामाजिक संघटनेचे वतीने शनिवारी २६ ऑगष्टला स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात दुपारी 12 वाजता दिव्यांगासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. यात दिव्यांगांचे हक्क,अधिकार आणि समस्याचे निवारण करण्यासाठी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख मृत्यंजय मोरे यांच्या सहकार्यातून हे चर्चासत्र होत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहारचे जिल्हा प्रमुख प्रमोद कुदळे असणार आहे. तर कार्यक्रमाचे उद्घाटक वणीचे उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा आहे. प्रमुख अतिथी विजय साळवे, तहसिलदार मारेगाव, सुनिल तलवारे,गटविकास अधिकारी, पं.स.मारेगाव यांच्यासोबत मारेगावचे मुख्याधिकारी संदीप बोरकर सोबतच मिर्झापुरे,नगरसेवक, यवतमाळ, अरूणा मोरे, नगरसेविका, मारेगाव, हे उपस्थित राहणार आहे.

(वणी शहर हिरवेगार करण्याच्या उपक्रमाला होणार पुन्हा सुरूवात)

या चर्चासत्रात तालुक्यातील दिव्यांगानी सहभागी होऊन मान्यवराच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एका पत्रकातुन तालुका प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.