नगरपंचायत कर्मचाऱ्याचे एक दिवसीय काम बंद आंदोलन
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे वेधले लक्ष
नागेश रायपुरे, मारेगाव: नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी स्थानिक नगरपंचायत भवनासमोर कामबंद आंदोलन केले. संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समितीने एक दिवसीय कामबंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदने दिलीत. तरीसुद्धा शासन दुर्लक्ष करीत असल्याने मारेगांव नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत भवनच्या पार्कींग हॉल मध्ये एकदिवसीय कामबंद आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे नागरिकांच्या एक दिवसाच्या कामावर परिणाम झाला.
या आंदोलनात नगरपंचायत मारेगावचे कर्मचारी शेख हबीब, गणेश निखाडे, रामदास दुधकोहळे, स्वाती आवारी, प्रभाकर बुरुजवाडे, सुनील काळे, राजकुमार नेहारे, अरूण किन्हेकर, राजू नेहारे, शारदा मुंघाटे, अक्षय देवाळकर , प्रदीप काटकर, अतुल गानफाडे, गणेश बदकी, सचिन अक्कलवार इत्यादी कर्मचारी सहभागी झाले होते.