झरी तालुक्यात दोन दिवसात 6 रुग्ण

आरसीसीपीएल कंपनीने वाढवली परिसरात चिंता

0

सुशील ओझा, झरी: काल झरी तालुक्यात 2 रुग्ण आढळल्यानंतर आज शनिवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी कोरोनाचे आणखी 4 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण आरसीसीपीएल या कंपनीतील  असून परप्रांतिय आहेत. तालुक्यात कंपनीमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याचे पडसाद मुकुटबन येथे पडताना दिसत आहे. कंपनीबाबत नागरिकांमध्ये रोष असून भितीचे वातावरण पसरले आहेत.

काल आणि आज झरी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण बिहार आणि झारखंड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. आधी 7 काल 2 व आज 4 रुग्ण आढळल्याने तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या 13 झाली आहे.

कंपनीतून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भिती
मुकुटबन येथे आरसीसीपीएल ही कंपनी आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणात परप्रांतातून मजूर कामानिमित्त आले आहेत. या कामगारांची कोणतीही तपासणी न करता त्यांना कामावर रुजू केल्याचा आरोप राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. तसेच कंपनी तात्पुरती बंद करावी अशा मागणीचे निवेदनही भाजपतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते.

25 जुलै रोजी आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत उत्तरप्रदेश येथील 27 कामगार आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यातील 3 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले होते. हे तीन रुग्ण कंपनीतील 350 जणांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत सारखी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुकुटबनचे सरपंच शंकर लाकडे व हिंदू रामसेनेचे कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत कंपनीतील एकही व्यक्ती मजूर किंवा अधिकारी गावत येऊ देणार नाही अशी भूमिका घेत कंपनी तात्पुरती बंद करावी अशी मागणी केली होती. सध्या तालु्क्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.