अतिक्रमीत शौचालय व दुकान त्वरित हटविण्याची मागणी

घरात सांडपाणी शिरत असल्याने नागरिक त्रस्त

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वणी ते मुकुटबन मुख्य मार्गावरील लेआऊल समोरील प्लॉट धारकाने ग्रामपंचायत व शासकीय बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून शौचालय व दुकान बांधले आहे. या शौचालयाचे सांडपाणी व दुकानातील पाणी घरात शिरत असल्याने आजूबाजूचे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सदर अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुकुटबन येथील वॉर्ड क्रमांक मधल्या लिंगारेड्डी अंडेलवार लेआऊट मध्ये गजानन दमडाजी गारमेलवार राहत आहे. याच लेआऊट मधील मुख्य मार्गावरील एका प्लॉट धारकाने दुकानाची चाळ काढून दुकाने भाड्याने दिली आहे. सदर दुकानदाराने स्वतःच्या जागेच्या व्यतिरीक्त सरकारी जागेवर अतिक्रमण करून दुकान बांधले आहे तसेच कुक्कुट पालन करण्याकरिता बेंदे उभारले आहे. कोंड्याचे बेंदे धुण्याचे पाणी, बोअरचे पाणी तसेच अतिक्रमित जागेवचे पाणी लेआऊट मधील भोयर यांच्या प्लॉट मधून गारमेलवार यांच्या घरात घुसत असल्याने गारमेलवार कटुंबिय त्रस्त झाले आहे.

वॉर्ड क्र ५ मध्ये येणाऱ्या याच लेआउटच्या मुख्य मार्गावर नवीन शौचालय बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. प्लॉट धारकांना येण्या जाण्याकरिता हा एकमेव रस्ता असून शौचालयाच्या सांडपाण्यामुळे तेथील जनतेला येण्या – जाण्या करीता मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सदर अतिक्रमण धारकाने ग्रामपंचायतच्या नालीच्यावर शौचालयाचे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. याबाबत वॉर्डातील लोकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारसुद्धा केली होती परंतु ग्रामपंचायतने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.

वॉर्डातील जनतेला याच मार्गाने मोटर सायकलने व पायदळ जाणे येणे करावे लागते वाहन शौचालयाला धडक लागून पडला किंवा अपघात होऊन कुणी जखमी झाल्यास याला जवाबदार कोण ? असाही प्रश्न तक्रारीतून उपस्थित करण्यात आला आहे. अतिक्रमन न काढल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा गारमेलवार यांनी ग्रामपंचायत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस स्टेशन याना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.