चिखलगाव येथील दोन मान्यताप्राप्त सेतू सुविधा केंद्रांपैकी एकच सुरू

दुसरे केंद्र ताबडतोब सुरू करण्याची युवक कॉंग्रेस कमिटीची मागणी

0

विवेक तोटेवार, वणी: नजीकच्या चिखलगाव येथे दोन सेतू केंद्रची मान्यता आहे. तरीदेखील त्यातले एक केंद्र बंद आहे. दुसरे केंद्र ताबडतोब सुरू करण्याची मागणी युवक कॉंग्रेस कमिटीने केली. अशोक नागभीडकर आणि प्रदीप खेकारे यांच्या सहींसह हे निवेदन वणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

निवेदनानुसार गावात सेतू केंद्र अंतर्गत कोणत्याही सुविधा सर्वसामान्य जनतेला मिळत नाही. शैक्षणिक अथवा
शासकीय कागदपत्र तयार करण्यासाठी नागरिकांना वणी येथे जावे लागते. लोकांचा वेळ व त्यांची मजुरी बुडून
लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

जर लोकांना गावातच सेतू अंतर्गत सुविधा मिळाल्यास खूप मोठी अडचण दूर होऊन दिल्रासा मिळेल. चिखलगाव येथील मान्यता असलेले दुसरे सेतू सुविधा केंद्र ताबडतोब सुरू करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.