चिंचाळा येथे शेतातील गोठ्याला आग

बैलाच्या मृत्यूसह लाखो रुपयांचे नुकसान

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चिंचाळा येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. लोभेश्वर गोसाई खोले व संतोष गोसाई खोले असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

Podar School 2025

लोभेश्वर व संतोष खोले यांची चिंचाळा शिवारात दहा एकर शेत जमीन आहे. प्राप्त माहिती नुसार सकाळी 5 वाजता या शेतकऱ्यांचा एक बैल वेसण तोडून घरी परत आल्याने दरम्यान शेतकऱ्याने शेताकडे धाव घेतली. तेव्हा शेतातील गोठ्याला आग लागून गोठा बेचिराख झाल्याचे आढळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या आगीत एका बैलाचा मृत्यू झाला. एक बैल गंभीर जखमी झाला. गोठ्यात असलेले 16 बॅग खत, बियाणे, फवारणी यंत्र, विविध मशागतीची साधने, पाईप, कुठार टिनपत्रे आदी शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत शेतकऱ्याचे जवळपास दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. हतबल झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकरी शासना कडून आर्थिक मदतीच्या उपेक्षित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.