जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 29 ऑगस्ट शनिवार रोजी वणीत कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. यात 2 रुग्ण ग्रामीण भागातील तर 4 रुग्ण वणी शहरातील आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील कोविड पॉजिटिव्हचा आकडा 158 झाला आहे.
आज आलेल्या रिपोर्टमध्ये जटाशंकर चौक येथील 2 रुग्ण, रंगनाथ नगर येथील 1 रुग्ण, रंगारी पुरा येथील 1 रुग्ण तर 2 रुग्ण भालर येथील आहेत.
परिसरात कम्युनिटी स्प्रेडिंगची भीती?
गेल्या आठवड्यापासून वणीत कोरोनाचे रुग्ण अचानक झपाट्याने वाढत आहे. यातील अनेक व्यक्तींमध्ये कोरोनाचे लक्षणं नाहीत तर अनेक व्यक्ती कोणत्याही पॉजिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात न आल्याने पॉजिटिव्ह निघाले आहेत. जेव्हा रुग्णांचा सोर्स आढळून येत नाही व अचानक झपाट्याने रुग्णसंख्या वाढू लागते. अशा वेळी त्याला कम्युनिटी स्प्रेडिंग म्हटलं जातं.
सध्या कम्युनिटी स्प्रेडिंगबाबत प्रशासनाकडून कोणतेही सुतोवाच करण्यात आले नसले तरी वणीत अचानक झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने कम्युनिटी स्प्रेडिंगकडे वाटचाल तर नाही अशी भीती निर्माण झाली आहे. याबाबत वणी बहुगुणीने एका खासगी डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी कम्युनिटी स्प्रेडिंगची सध्या नसली तरी त्याकडे वाटचाल सुरू असल्याचे सध्याचे रुग्णसंख्येवरून दिसून येत असल्याचे सांगितले. शिवाय सतत ताप असणा-या रुग्णांना कोविडची टेस्ट करण्यास पाठवले असता त्यातील अधिकाधिक व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे शहरवासीयांनी आता अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.