माणूसकिला काळीमा… गतीमंद तरुणीवर अत्याचार

न. वागदरा येथील घटना, नराधम आरोपी गजाआड

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या वागदरा येथे एका गतीमंद तरुणीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलिसात 22 वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

आरोपी वडा उर्फ प्रीतम रविंद्र चट्टे (22) हा नवीन वागदरा येथील रहिवाशी आहे. सकाळच्या सुमारास आरोपीने त्याच गावात राहणा-या एका गतीमंद मुलीला फूस लावून शासकीय आयटीआयच्या मागे असलेल्या निर्जन जागी नेले. त्या ठिकाणी नेऊन त्याने तरुणीवर शारीरिक अत्याचार केला. घरी आल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.

पीडितेच्या आईने आरोपीच्या आईशी बोलून समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीच्या आईने झालेला प्रकार हा आपल्या मुलाने केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेच्या आईने वणी पोलीस ठाणे गाठून आरोपी प्रीतम विरुद्ध तक्रार दिली.

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी वडा उर्फ प्रीतम रविंद्र चट्टे विरोधात भादंविच्या कलम 376 (L) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पीडितेला वैद्यकीय तपासणी करीत वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. डॉक्टरांच्या अहवालानुसार पीडितेवर अन्याय झाल्याचे समोर आले आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे. विशेष म्हणजे आरोपी तरुणही गतीमंद असल्याची माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.