नागेश रायपुरे, मारेगाव: तहसील कार्यालय मारेगाव येथे निराधार विभागात कार्यरत असलेले एक कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून मनमानी कारभार करत असून यामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप युवासेनेतर्फे करण्यात आला आहे. त्या वादग्रस्त कर्मचाऱ्यास निराधार टेबल वरून हटवण्यात यावे अशी मागणी युवासेनेने निवेदनातून तहसिलदारांकडे केली आहे.
तहसिल कार्यालयमधून श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार अंतर्गत येणाऱ्या विविध योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचा-यांकडून लाभार्थ्यांना नेहमी उद्धट वागणूक मिळते त्यांच्या मनमानी काराभाराचा लाभार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे लाभार्थी पुरते वैतागले आहे. असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
लाभार्थीनी आपल्या कामा संदर्भात त्या कर्मचाऱ्यास विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले जाते. कामे विलंब होत असताना लाभार्थ्यांना समाधान कारक उत्तर मिळत नसल्याने, लाभार्थी एखादा सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विचारणा केली असता, त्यांना सुध्दा समाधानकारक उत्तर न देता उद्धट वागणूक दिली जाते. असा आरोप निवेदनात आहे.
या वादग्रस्त कर्मचा-यास निराधार योजनेच्या टेबल वरून तात्काळ 7 दिवसाचे आत हटवण्यात यावे व कामे सुरळीत करण्यात यावे अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनातून दिला आहे.
निवेदन देताना मयूर ठाकरे, श्रीकांत सांबजवार, गणेश आसुटकर, शुभम निखाडे, वैभव डुकरे, हरीभाऊ ठक, चंद्रकांत थेरे, प्रशांत तोंडासे, रमेश कोल्हे आदी युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.