विवेक तोटेवार, वणी: कोरोनामुळे धाबे व्यावसायिकांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. कोरोनामुळे अनके ग्राहक धाब्यात येत नाही. खवय्यांना कोरोनामुळे आपल्या जिभेचे चोचले पुरविणे कठीण झाले आहे. याबाबत मोंटू धाबा व्यावसायिकाने वणी बहुगुणीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनामुळे जवळपास सर्वच अर्थव्यवस्था धाब्यावर बसली आहे.
कोरोनामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. यामागचे कारण जो खानसमा जेवण बनविता आहे तो स्वतःला सॅनिटाइस करतो की नाही. आपणास पूर्णपणे सुरक्षित अन्न देतो की नाही. याकडे ग्राहकांचे लक्ष असते. त्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
मोंटू ढाबा हा बसस्थानक समोर आहे. ज्यामुळे ग्राहकांची नेहमीच या ठिकाणी वर्दळ असायची. परंतु कोरोनामुळे बाहेरगावाहून येणारे ग्राहक तर नाहीच्या बरोबर आहेत. त्यातच इतके दिवस बस बंद असल्याने व्यवसायाला फटका बसला आहे. अगोदर मोंटू धाब्यावर खाणाऱ्यांच्या रांगा बघावयास मिळत होत्या. परंतु आता मात्र ग्राहकांची वाट बघत बसावी लागते.
मोंटू धब्याचे मालक म्हणतात की, अगोदर त्यांच्याकडे 14 कर्मचारी काम करीत होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने आता मात्र यातील फक्त 4 जण काम करीत आहे. व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. ज्यामुळे धाब्यावर काम करणारे कर्मचारी कमी करावे लागले. आता फक्त खर्च काढणे शक्य आहे. प्रवासी कमी झाल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
सध्या शासनाकडून पार्सल व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. परंतु भीतीचे वातावरण असल्याने पार्सल व्यवस्था सुद्धा थंड बसत्यात आहे. कुणीही ग्राहक बाहेरचे खाण्यास तयार नाही. ही परिस्थिती अजून किती दिवस चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.