पावसाळी अधिवेशनात ओबीसी समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावा
◆ संभाजी ब्रिगेडतर्फे आमदार बोदकुरवार यांना निवेदन
जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात 52 टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाज विविध समस्यांनी ग्रस्त आहे. ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. येत्या 7 सप्टेंबर पासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा घडवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे. या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने वणी विधानसभाचे भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार याना देण्यात आले.
संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हा तर्फे 1 सप्टेंबर रोजी राज्य शासनाकडे सुद्दा याबाबत प्रस्ताव व मागण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. वणी विधानसभेचे आमदार महाराष्ट्र विधानसभेत ओबीसी समाजाचे प्रतिनिधी असल्याकारणाने त्यांनी ओबीसी समाजाला समस्येतून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे.
अशी मागणीचे निवेदन देताना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अजय धोबे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मंगेश खामणकरसह विजय पिदूरकर, भाऊसाहेब आसुटकर, ऍड.अमोल टोंगे, दत्ता डोहे, आशिष रिंगोले व इतर संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता उपस्थित होते.