मुकुटबन येथील महिलेचा घरात घुसून विनयभंग

पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, आरोपीस अटक

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका महिलेचा घरात घुसून तरुणाने विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुकुटबन येथीलच तरुण श्रीनिवास संदरलावार हा नेहमी गावातीलच एक महिलेच्या घरी कामानिमित्त जात होता. परंतु 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता दरम्यान त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सदर महिलेचा मुलगा आंघोळ करून बाहेर गेला. मुलगा बाहेर गेला म्हणून महिला घराचा दरवाजा उघडा ठेऊनच जमिनीवर चटई टाकून झोपली. थोड्याच वेळात गावातीलच श्रीनिवास संदरलावार (40) आपल्या दुचाकीने आला. महिलेच्या घरात प्रवेश केला. महिला घाबरून उठली व आरडाओरड करू लागली. तेवढ्यात मुलगा घरी परत आला. त्याने तरुणांच्या तावडीतून आईला सोडविले.

पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून पोलिसांनी घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (ड) (1) 451 नुसार गुन्हा नोंदवला. आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.