सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिचघाट येथील शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीची 150 झाडे उपटलेत. त्यामुळे 11 हजाराचे नुकसान झाले आहे. एका संशयिताविरोधात ही तक्रार पोलिसांत केली. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील चिचघाट येथील शेतकरी किसन काशिनाथ कोहळे (45) यांचे शेतशिवारात गट नं 19 आहे. शेतात संपूर्ण कपाशीची लागवड केली आहे. शेताला पाणी देण्याकरिता बोअरवेलसुद्धा आहे. 1 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजता दरम्यान गावातीलच संशयीत सुधाकर परचाके (40) याने शेतातील १०० नग कपाशीचे उभे झाडे उपटली. तसेच मोटरचे स्टाटर ग्रीप यांचे नुकसान केले. असा आरोप करीत तक्रार करण्यात आली.
परचाके यांनी यापूर्वीही 8 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7 वाजता 50 नग कपाशीचे उभे झाडे उपडून नुकसान केल्याची तक्रार किसन कोहळे यांनी मुकुटबन ठाण्यात दिली. तक्रारीवरून पंचनामा करण्यात आला व परचाके यांच्याविरुद्ध नुकसान केल्याप्रकरणी 427 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रवीण ताडकोकुलवार व संदीप बोरकर करीत आहे.