रवी ढुमणे, वणी: मुकुटबन पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या इजासन येथील २५ वर्षीय शेतकरी पुत्राने शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली आहे. वणी तालुक्यातील इजासन(गोडगाव) येथील आशिष गजानन उईके (२५) हा शेतात मशागतीची कामे करायला गेला होता. दुपारी दीडच्या सुमारास त्याने शेतातच विषारी द्रव्य प्राषण केलं.
यासंबंधीची माहिती लोकांना मिळताच त्यांनी आशिषला कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र आशिषची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
(हे पण वाचा: वणीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2259 घरांना मान्यता)
तालुक्यात तरुण शेतकरी पुत्राने आत्महत्या का केली हे अद्याप कळले नसले तरी शेतातील पिके धोक्यात आल्यानं त्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. सोबतच शेतीला लागणारे कर्ज व घरातील आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याचा कयास देखील वर्तविण्यात येत आहे.