नागेश रायपुरे, मारेगाव: पंचायत समिती मारेगाव येथील एक कर्मचारी पॉजिटिव्ह आला असताना आज तालुक्यातील कुंभा नजिक असलेल्या सिंधी (महागाव) येथे कोरोनाच शिरकाव झाला आहे. येथील एक 47 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.
ही महिला वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. त्या महिलेमध्ये कोरोनाचे लक्षणं आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना टेस्ट करण्यास सांगितले. या टेस्टमध्ये सदर महिला पॉजिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले.
पॉझिटिव्ह आलेल्या शिंदी येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या सुमारे 40 व्यक्तींना ट्रेस करण्यात आले आहे. वृत्त लिही परंत पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या घराचा परिसर सील करण्याची प्रक्रिया चालू होती.
44 व्यक्तींचे घेतले स्वॅब
गुरुवारी पंचायत समिती येथील एक कर्मचारी पॉजिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील 44 व्यक्तींचे स्वॅब टेस्ट साठी यवतमाळ येथे पाठवले आहे. तसेच प्रशासनाने खबरदारी म्हणून माधव नगरी परिसर सिल करून त्याला कन्टेन्टमेंट झोन जाहीर केले आहे.
काही दिवसांआधी कुंभा येथील एक पुरुष कोरोना पॉजिटिव्ह आढळला होता. ती व्यक्ती लवकरच रिकव्हर झाली. त्यानंतर 1 ते 2 महिने तालुकात कोरोनापासून दूर होता. त्यामुळे नागरिकही निश्चिंत झाले होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर गायब झाले होते. मात्र आता पुन्हा दोन रुग्ण आढळल्याने लोकांच्या चेह-यावर मास्क परत आले आहे.