धारदार शस्त्र घेऊन जाताना तरुणाला अटक

भीमनगरातील तरुणाला तलवार घेऊन जाताना अटक

0

रवी ढुमणे, वणी: शनिवारी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार बंदोबस्तात असताना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून धारदार तलवारीसह दुचाकीने येणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.

सध्या शहरात गणेशोत्सव, बकरी ईद आदी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. बकरी ईद असल्याने ठाणेदार मुकुंद कुळकर्णी हे बंदोबस्ताच्या गस्तावर होते. दरम्यान त्यांना एक युवक शहरातील भीमनगर भागाकडून दुचाकी क्रमांक एम एच 29 पी 3450 वर धारदार तलवार बांधून शहरात येत असल्याची माहिती मिळाली.

ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या दोन तुकड्या करून सापळा रचला. यात अरुण नाकतोडे, सुदर्शन वानोळे,सुनील खंडागळे, सुधीर पांडे, शेख नफिस, उल्हास कुरकुटे, दिलीप जाधव सह ठाणेदार मुकुंद कुळकर्णी हे दबा धरून बसले होते.

भीमनगर कडून एसपीएम शाळेकडे  येणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करून प्रत्येक वाहने तपासण्याची मोहीम सुरू केली. त्यात एक युवक दुचाकीवर तलवार बांधून येतांना दिसताच नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांच्या तुकड्यानी त्याला घेरले. मोटारसायकल व धारदार तलवारी सह पकडले. त्या तरुणाची चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव अमित वाघनाथ सातपुते २७ रा.भीमनगर असे सांगितले.

बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक करून अवैध शस्त्रसाठा बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.