सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील ग्रामपंचायत मध्ये प्रशासक म्हणून गड्डमवार यांची नियुक्ती झाली. त्यांच संभाजी ब्रिगेड अडेगाव तर्फे सत्कार करण्यात आला.
जि. प.उच्च प्राथमिक शाळा अडेगाव येथील मुख्याध्यापक गड्डमवार यांच्या पदानियुक्तीवेळी राजमाता जिजाऊंची प्रतिमा व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सरकार ग्रामपंचायत निवडणुका घेऊ शकत नाही. सरपंचाची संपलेली मुदत लक्षात घेता सरकारने प्रशासनातील लोकांना गावागावात सरपंच म्हणून नियुक्त केले आहे. प्रशासक हा आता गावातील सरपंचाची जागा घेईल. त्यांना सरपंचाचे सर्व अधिकार वापरता येणार आहे.
आजपर्यंत गावातील व्यक्ती निवडणुकीतून सदस्य निवडायची. आपल्यातल्या एका व्यक्तीला सरपंच करत होती. अनेकदा निष्क्रिय, अशिक्षित सरपंच निवडून गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता प्रशासनाचा अनुभव असणारा सुशिक्षित व्यक्तीची या निमित्ताने निवड होत आहे. त्याचा सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. सुशिक्षित सरपंच ही अनेकांची मागणी होती. ती आता पूर्णत्वास आली आहे.
सत्कार समारंभात संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देव येवले, शाखा अध्यक्ष राजू काळे, प्रशांत बोबडे, अभय पानाघटे, शंकर झाडे, संदीप असुटकर, संजय पावडे, गौरव धोटे, विकास पारखी, शुभम गोवारदिपे, मोणू शेंगर, आशीष झाडे, संजय आसुटकार, पुरुषोत्तम आसुटकर, अमोल गौरकार, दिलीप पाचाभाई, रामदास गोचे आदी उपस्थित होते