‘’आम्ही नाही करणार कोरोना सर्वेक्षण’ – आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक
‘या’ कारणांस्तव सर्वेक्षण करणाऱ्या टीमने दिला चक्क नकार
विवेक पिदुरकर, वणीः आम्ही आता यापुढे कोरोना सर्वेक्षण करणार नाही. असा इशारा म. रा. आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेने दिला. आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या टीमने चक्क नकार दिला. यामागील कारणही तेवढेच धक्कादायक आहे. विश्वास बसणार नाही, इतक्या कमी मानधनावर त्यांच्याकडून हे काम करवून घेतल्याचं संघटनेने म्हटलं आहे. तसं निवेदन त्यांनी वणीच्या तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलं.
आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांनी निवेदनात स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यानुसार ते आधीचे कार्य नियमित करीत होते. करीत राहतील. त्यांना त्यांच्या या कामांचा योग्य मोबदला मिळत होता नि आहे. कोरोना काळात शासनाने कोरोना सर्वेक्षणाचे नवीन काम दिले. त्याचं मानधन काही ठरवलं नाही. मानधन वाढेल अशी अपेक्षा संघटनेने केली होती. तरीदेखील यात काहीच बदल झाला नाही.
केवळ 33रूपये रोज या प्रमाणे निवेदनकर्त्यांकडून काम करवून घेतले जात. सध्या आशावर्कर्स या खेडोपाडी घरोघरी जाऊन कोरोना संदर्भात सर्वेचे काम करीतआहे. जीव धोक्यात घालून काम करीत आहे. मात्र प्रशासनाने त्यांची 3३ रुपये मानधन देऊन थट्टा लावल्याचं म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर यापुढे या टीमला योग्य मानधनाशिवाय कोरोनासंदर्भातील कोणतीच कामे सांगू नयेत, असंही म्हटलं आहे. ही टीम त्यांची पूर्वीची कामे नियमितच करीत राहील असंही निवेदनात म्हटलं आहे.
http://(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)