मांगरूळचे श्री भालचंद्र महाराज ह्यांची प्राणज्याेत मालवली
लाखो भाविकांवर कोसळला दुःखाचा डोंगर, गुरुवारी सायंकाळी समाधी
नागेश रायपुरे, मारेगाव : लाखो भाविकभक्तांचे श्ररद्धास्थान संत श्री जगन्नाथ बाबांचे नातू सदगुरु श्री अवलिया बाबा भालचंद्र महाराज (58) यांची गुरुवारी पहाटे 5.30 वाजता मांगरूळ येथील मठात प्राणज्योत मावळली. ही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच त्यांच्या लाखो भाविकभक्तांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत.
सदगुरु श्री भालचंद्र नीलकंठ धानोरकर यांचा जन्म भांदेवाडा येथे 30 मार्च 1962 रोजी झाला. ते संत जगन्नाथ महाराज यांचे वंशज होते. ते लहानपणापासूनच अवलिया बाबा म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांना मुळातच भजन करायची आवड होती. त्यांना हार्मोनियम, तबला, ढोलकी, खंजिरी वाजवायची आवड होती. ते आपल्या भजनातून लोकांचं प्रबोधन करायचे.
1994 साली ते भांदेवाड्यावरून मारेगाव येथील नीळकंठ लडके यांच्या घरी रात्री भजन करण्यासाठी आले. तेव्हा मांगरूळ येथील गोसाई धोबे यांचा हात पकडून ते मांगरूळ येथे आले. तिथूनच ते मांगरुळ येथे 24 वर्षा पासून मठात राहायचे.
त्यांच्या अलौकिक गुणांचा लाभ आणि अनुभव भाविकांना मिळाल्याचं सांगतात. मांगरुळ येथे लोकवर्गिणीतून भव्य मोठे मंदिर उभारण्यात आले आहे. आज 5 वाजता दरम्यान त्यांच्या मठातच त्यांना समाधी देणार आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)