चोरली त्याने गाडी आणि हातात पडली बेडी

दुचाकी चोरट्यास केले जेरबंद, डीबी पथकाची कारवाई

0

विवेक तोटेवार, वणी: तो चोरलेली गाडी घेऊन उभा होता. त्याला पुढे काय होईल याची तीळमात्रही कल्पना नव्हाती. एका बेसावधवेळी अचानक पोलीस आलेत. त्याला गाडीसहीत ताब्यात घेतले. गाडी चोरणाऱ्याच्या हातात बेड्या पडल्यात. छोरीया ले आऊट येथून 2 सप्टेंबर रोजी एक दुचाकी चोरी गेली. याबाबतची तक्रार 11 सप्टेंबर रोजी वणी पोलिसात देण्यात आली होती. पोलिसांनी 18 सप्टेंबर रोजी घोन्सा चौफुली येथून चोरट्यास अटक करीत दुचाकी जप्त केली आहे.

छोरीया ले आऊट गणेशपूर येथे राहणाऱ्या सुरेश देवराव बलकी यांची दुचाकी क्रमांक (MH 29 BA 5842) ही अज्ञात चोरट्याने चोरली. त्यांनी याबाबतची तक्रार 11 सप्टेंबर रोजी वणी पोलिसात दिली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध वणी पोलिसांनी भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शुक्रवारी 18 सप्टेंबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, सदर दुचाकी घेऊन घोन्सा रोडवर एक इसम उभा आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात आरोपी सौरभ घनश्याम भटवलकर (21) रा. सेवानगर यास अटक करीत दुचाकी ताब्यात घेतली. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केली.

 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.