विवेक पिदुरकार, वणी: युवासेना आणि युवतीसेनेत युवकांना काहीतरी नवे गवसत आहे. काहीतरी भन्नाट विषय मिळत आहेत. त्यांची ऊर्जा आणि सामर्थ्य योग्य दिशेने काम करीत आहे. त्यामुळेच युवासेना आणि युवतीसेनेत युवकांचं मोठ्या प्रमाणात इनकमींग सुरू आहे. युवासेना यवतमाळ जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना ही माहिती दिली.
शनिवारी १९ सप्टेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वासभाऊ नांदेकर आणि युवासेना विस्तारक दिलीपदादा घुगे यांच्या मार्गदर्शनात युवासेना यवतमाळ जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांचा कार्याला प्रेरीत होऊन वणी तालुक्यामधील काही युवकांचा युवासेनामध्ये शिवबंधन बांधून प्रवेश झाला. काही युवतींचा युवतीसेनेत शिवबंधन बांधून प्रवेश झाला.
यावेळी वेळाबाईचे सरपंच प्रभूदास नगराळे व अनुप चटप यांची युवासेना वणी तालुका समन्वयकपदी निवड झाली. रुपेश डाहुले यांची उपतालुका प्रमुख, (शिरपूर शिंदोला सर्कल) व मनोज ताजने यांची विभाग प्रमुख (शिंदोला सर्कल)पदी निवड करण्यात आली. उपस्थित प्रवेश करणारे श्रीकांत डाहुले, प्रफुल नगराळे, नाथन शालूरकर, दशरथ पायघन, प्रफुल सातपुते, अविनाश बावणे व असंख्य युवकांनी प्रवेश केला. यावेळी अमित लिचोडे उपशहर प्रमुख वणी, हे उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे युवासेनेत प्रवेश करण्यासाठी अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)