विवेक तोटेवार, वणी: पंधरा दिवसांपूर्वी मंदर येथील एका शेतगड्याला फवारणी करताना सर्पदंश झाला होता. उपचारानंतर रुग्णालयातून सुटी घेऊन तो घरी आला. मात्र त्याचा दि. 19 शनिवारी रात्री अचानक त्याचा मृत्यू झाला.
तालुक्यातील मंदर येथील शेतकरी पुरुषोत्तम बोढे यांच्या शेतात सोयाबीन पिकात कीटकनाशकाची फवारणी करताना महादेव बापूराव मडावी (39) याला 15 दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. वणी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान प्रकृती सुधारल्यामुळे त्याला सुट्टी मिळाली होती. तो दोन दिवसांपूर्वी सासुरवाडीला कोरपना तालुक्यातील सावरहिरा येथे भेटण्यासाठी गेला होता. मात्र रविवारी रात्री अचानक त्याची प्रकृती बिघडली. यावेळी रक्ताची ओकारी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा बराचसा परिवार आहे. या घटनेने कुटुंबियासह सर्वांनाच धक्का बसला.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)