आनंदाची बातमी, 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

एन.बी.एस.ए. कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रवेश सुरू

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी:  नव्याने शिक्षणाचा प्रवास सरू ठेवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. एन.बी.एस.ए. कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रवेश  15 ऑक्टोबरपर्यंंत सुरू राहतील.

आपल्या आयुष्यात डिग्री मिळवण्याची संधी काही कारणांमुळ हुकली असेल. ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी आता चालून आली आहे. आपले आधीचे शिक्षण काही कारणांनी थांबले असले, तरीही हे स्वप्न आता पूर्ण करू शकता. विठ्ठलवाडीतील अहमद ले आऊट येथे न. प. शाळा क्रमांक 7 जवळ एन.बी.एस.ए. महाविद्यालय आहे. येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र आहे. इथे पूर्वतयारी, बी. ए. आणि बी. कॉमसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे या पदवीसाठी आपण आधी 10वी किंवा 12वी पास असणं आवश्यक नाही. त्यासाठी अभ्यासक्रमाची विषिष्ट रचना केली आहे. पूर्वतयारी, बॅचलर ऑफ आर्टस आणि बॅचलर ऑफ कॉमर्स असे तीन अभ्यासक्रम आहेत. दहावी किंवा बारावी पास, नापास कुणालाही नियमानुसार पुढील शिक्षण घेता येतं. मराठी, इंग्रजी किंवा उर्दू मीडियममधून आपल्याला ही पदवी मिळवता येते.

वणीतील हे केंद्र यावर्षीच सुरू झाले आहे. नोकरी अथवा व्यवसाय करणारे असोत किंवा प्रापंचिक स्त्री-पुरुष असोत, सर्वांना हा अभ्यासक्रम सोयीचा आहे. आठवड्यातून केवळ एकच दिवस याचा क्लास असतो. बाकी काम आपण घरी बसूनच करू शकता. लॉकडाऊनच्या काळात कदाचित हे ऑनलाईनही होऊ शकतं. त्यामुळे खूप जास्त वेळ आणि परिश्रम न गुंतवता आपण ही डिग्री मिळवू शकता.

आतापर्यंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून अनेकांनी आपले पदवी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात दर्जेदार शिक्षणाचा लाभ या केंद्रात घेता येईल. प्रवेशाची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. अधिक माहितीसाठी 9960877996 किंवा 8208924243 या मोबाईल नंबर्सवर संपर्क साधू शकता. या संधीचा लाभ घेण्याची विनंती प्राचार्य तथा केंद्रप्रमुख यांनी केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.