नागेश रायपुरे, मारेगाव: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी अनेकांनी निषेध नोंदवला. या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन मारेगाव तालुका जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडने तहसीलदार दीपक पुंडे यांना दिले.
हाथरस येथील झालेला अमानवी अत्याचार हा महिला सुरक्षेतेच्या दृष्टिने घातक आहे. अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या राजकीय शक्तीमुळे महिलांवरील अत्याचाराचा आलेख वाढतच आहे. अशा अत्याचार करणाऱ्या नराधमांना जागीच ठेचले पाहिजे. शासनाने हाथरस अत्याचार प्रकरणी दोषी आरोपीवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा. ह्या मागणीचे निवेदन तहासीलदारांमार्फत देशाचे गृहमंत्री यांना दिले. घटनेचा निषेध नोंदविला आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा लीना पोटे, सचिव शीतल पारखी, ज्योती कुडमेथे, संभाजी ब्रिगेडचे किशोर जुनगरी, प्रमोद लडके, मराठा सेवा संघाचे तालुका सचिव कुंदन पारखी, विलास पोटे आदी उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)