डॉ.प्रा.निवृत्ती पिस्तुलकर यांनी केले विशेष संशोधन

महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केला सत्कार

0

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: भारती महाविद्यालय आर्णी येथे कार्यरत प्रा. निवृत्ती पिस्तुलकर यांनी समाज विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत अर्थशास्त्र या विषयात “पश्चिम विदर्भातील नाभिक व्यवसायाचे आर्थिक अध्ययन “(कालखंड 2000 ते 2010) हा शोधप्रबंध संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे सादर केला होता. परीक्षकांनी सूक्ष्मरीतीने तपासणी करून संशोधन कार्य स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यांच्या ह्या संशोधनाकरिता महाराष्ट्र नाभिक महामंडळाने त्यांचा सत्कार केला.

नाभिक समाजातील उत्पतीपासून जातीनिहाय व्यवस्था, नाभिक समाजाचे बलुतेदारीपध्दती स्थानापासून पारंपारिक केशकर्तनासह वर्तमान स्थितीतील हेअर पार्लर पर्यंतचा व्यावसायिकांनी केलेला प्रवास गुणदोषांसह आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक तथा आरोग्य विषयक स्थितीचा संशोधनात आढावा घेऊन ग्रामीण व शहरी व्यावसायिकांचे तुलनात्मक व चिकित्सकदृष्ट्या अध्ययन केले आहे. नाभिक समाजाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन म्हणजचे सलून व्यवसाय.

ह्या व्यवसायावर व सध्याच्या आर्थिक स्थितीवर सखोल संशोधन केल्याबद्दल विद्यापीठाने प्रा.पिस्तुलकर सर यांना “आचार्य” PHD. पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला. महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा यवतमाळ वतीने प्रा. निवृत्ती पिस्तुलकर यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार श्री. संत सेना महाराज संस्थान आर्णी येथे करण्यात आला. जिल्हाध्यक्ष शशिकांत नक्षणे यांनी शाल, श्रीफळ, व महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

याप्रसंगी आचार्य पदवीप्राप्त पिस्तुलकर, नाभिक समाजकरिता “भूषण” असून त्यांनी केलेले संशोधन पुढील पिढीकरिता अमूल्य ठेवा आहे. ते दिशादर्शक ठरेल असे मत जिल्हा सरचिटणीस अंबादास धामोरे यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. कार्यक्रमास शेखर वानखेडे होते. सोने, महेश हरसुलकर, नागेश्वर निंबालकर, दत्ता कदम, सुधाकरराव चिटेकर, दिलीप मादेशवार, अजय धांडे व प्रतिष्ठित मंडळीनी सामाजिक दुरीतीचे पालन करून कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष पुंडलिकराव कुबडे यांनी केले. प्रकाश मादेशवार यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.