सावधान… कॅशबॅकच्या नावाखाली अनेकांना फेक कॉल

कॉल करून गंडवण्याचा प्रयत्न

0

जब्बार चीनी, वणी: आधी केवळ मोठ्या शहरापुरते मर्यादित असणारे ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार आता वणी सारख्या शहरात आणि ग्रामीण भागातही वाढू लागले आहेत. एटीएम एक्सपायर होत आहे किंवा आपल्याला गिफ्ट मिळाले आहे असे ऑनलाईन पाकीटमारिचे फंडे वापरल्यानंतर आता सायबर गुन्हेगारांनी कॅशबॅकची बतावणी करून गंडा घालण्यास सुरूवात केली आहे. राज्यात कॅशबॅकच्या नावाने गंडा घातल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. वणीत जरी अशा प्रकारे गंडवण्याचे प्रकार घडले नसले तरी याबाबत परिसरात अनेकांना कॉल येत आहे. असाच एक प्रकार नुकताच वणीत घडला. मात्र प्रसंगवधान राखल्याने ऑनलाईन पाकीटमारीपासून ते थोडक्यात बचावले.

सध्या परिसरात अनेक लोक कॅशबॅकसाठी तसेच वापरण्यास सोयीस्कर असल्याने फोन पे आणि गुगल पे सारख्या ऍपचा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापर करतात. यातून केवळ मोबाईल नंबरवरून पैसे तर ट्रान्सफर होते, शिवाय यावर घसघशीत कॅशबॅक (गिफ्ट मनी) दिले जाते. मात्र आता याचा वापर गंडा घालण्यासाठी केला जात आहे. वणीतील शाम टॉकीज परिसरातील एका व्यक्तीला कॅशबॅक मिळाली आहे असा कॉल आला.

त्या फेक कॉल करणा-यांनी आपले बराच कॅशबॅक पेंडिंग असल्याचे सांगितले. जर तुम्हाला कॅशबॅक हवे असल्यास माहिती वेरिफाय करावी लागेल असे सांगितले व सोबतच गुगल पे वरून एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. मात्र त्यांना कॉलवरून संशय आला. त्यांनी त्याबाबत अधिक माहिती काढली असता तो फेक कॉल असल्याचे लक्षात आले.

गंडा घालणारे कोणते ऍप डाऊनलोड करण्यास सांगतात?
सध्या स्क्रीन शेअरिंगचे अनेक ऍप उपलब्ध आहेत. यात एनी़डेस्क हे ऍप सर्वात प्रसिद्ध आहे. याशिवाय टीम व्ह्यूवर, स्क्रीनलीप, क्रोम रिमोट डेस्कटॉप, गोटूमिटिंग, युज टुगेदर, सिस्को वेब एक्स इत्यादी ऍपही प्रसिद्ध आहे. हे ऍप डाऊनलोड केल्यावर कॉल करणारे आपला शेकरिंग कोड मागतात व शेअरिंग रिक्वेस्ट एक्सेप्ट करायला लावतात. रिक्वेस्ट एक्सेप्ट करताच त्यांना आपला मोबाईल वापरता येतो. तेथून ते पैसे ट्रान्सफर करतात. तसेच आलेला ओटीपी देखील त्यांना त्यांच्या मोबाईलवरून कॉपी करता येतो. अशा प्रकारे ते ऍप डाऊनलोड करून गंडा घालतात.

ओटीपी कुणालाही सांगू नका….
बँकेद्वारा वेळोवेळी आपला ओटीपी कुणालाही सांगू नका तसेच एटीएम बाबतची माहिती कुणालाही फोनवर देऊ नका असे सांगण्यात येते. तसेच बँक कोणत्याही ग्राहकांना माहिती विचारण्यााठी कॉल करत नाही असेही बँकेने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही एटीएम कार्ड एस्पायरी झाले, ऍप ब्लॉक झाले असे कारणे देऊन फसवणूक केली जाते. तरी कुणीही एटीएमची माहिती व ओटीपी मागत असेल तर तो कॉल फ्रॉड समजून अशी माहिती कुणालाही सांगू नये अशी सूचना केली आहे.

फसवणूक झाल्यास काय करावे?
फसवणूक झाल्याबरोबर तात्काळ याबाबत बँकेला माहिती दिल्यास पैसे परत मिळणे काही ठिकाणी शक्य आहे. यवतमाळ येथील एका पेन्शन अकाउंटमधून काढण्यात आलेले लाखो रुपये बँकेने परत मिळवून दिले होते. या शिवाय सायबर क्राईम विभागाकडे याची तक्रार केल्यास आरोपींवर कार्यवाही होऊ शकते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.