युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

नागेश रायपुरे, मारेगाव : एका युवा शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मार्डी येथे सकाळी 9 वाजता दरम्यान उघडकीस आली. विकास रामकृष्ण चौधरी (32) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक विकास हा गरुवारी दि. 8/10/2020 ला संध्याकाळच्या सुमारास घराबाहेर पडला. घरी न आल्याने घरच्या लोकांनी जवळपासचा सर्व परिसर शोधला; परंतु विकासचा शोध लागला नाही.

अखेर शुक्रवारी दि.9/10/2020ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास विकासचा मृतदेह शेतात झाडाला लटकून आढळला. मृतक विकासकडे 3 एकर शेती आहे. मृत्यूचे करण कळू शकले नाही.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.