जब्बार चीनी, वणी: विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यात नाळ जोडून ठेवणारी गो ग्रीन क्लबने कौतुकास्पद कार्य केलं. जणूकाही नावाप्रमाणेच या संस्थेने एका गरजू विद्यार्थ्याच्या जखमेवर हिरवी फुंकर घातली. तालुक्यातील बोर्डा गावाचा रहिवासी असलेला अपघातग्रस्त विद्यार्थी कुंदनला वैदकीय उपचारासाठी मदतीचा हात या संस्थेने दिला.
माणुसकीचे शिक्षण देणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथील शाळेत वर्ग दहावीचे शिक्षण घेणारा हा विद्यार्थी या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने गावी परत आला. वडलांना शेतीत हातभार लावावा म्हणून तो रोज शेतात जायचा. एकेदिवशी अचानक रस्त्यात त्याचा अपघात झाला.
त्यात त्याला डोक्याला जबर मार लागल्याने चंद्रपूरच्या हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आले. उपचारासाठी भरपूर पैसे लागत असल्याची गो ग्रीनच्या सदस्यांना माहिती मिळाली. क्षणाचाही विलंब न करता क्लबतर्फे तत्काळ त्या विद्यार्थ्याचे वडील सुरेश पानघाटे यांच्यापर्यंत मदत सुपूर्त केली.
यावेळी कुंदनचे वडील सुरेश पानघाटे, प्रकाश तुराणकर, राजेंद्र साखरकर, संजय चचाने, विलास मेश्राम, गजाजन तुरारे, महेश लिपटे, सचिन पावडे, ज्योती ढाले, साखरकर, लक्ष्मी दांडेकर, शीतल तुराणकर तसेच गो ग्रीन क्लबचे सदस्य हजर होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)