नागेश रायपुरे,मारेगाव: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यातील कुंभा येथे भजनावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रीत्यर्थ कुंभा येथील अरविंद ठाकरे यांनी गुरुदेव भजन मंडळास 22 हजार रूपये किमतीची हार्मोनियम भेट दिली.
कोणताही व्यक्ती संकटात सापडली असता, त्यांच्या मदतीला धावून जाणारे असे कर्तबगार खरे माणूस म्हणून ठाकरे ह्यांची ओळख आहे. त्यांनी यापूर्वी मराठवाड्यातील कोल्हापूरकडे पूरग्रस्तांनासुध्दा अन्नधान्य किट व जीवनावश्यक वस्तू वाहन भरून मदत पाठविल्या होत्या.
तसेच कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान परिसरातील शेकडो मजूर गरीब कुटुंबाना अन्नधान्य, किराणा किट व आर्थिक मदत केली आहे. तसेच अपघातग्रस्तांसह परिसरात गोरगरिबांच्या विवाहसोहळ्यातसुद्धा मदत केली आहे. परिसरात धार्मिक असो की सामाजिक कार्यक्रम यांचे योगदान मिळत असते.
भजनावली कार्यक्रम यशस्वितेकरिता विठ्ठलजी जोगी, प्रमोदजी उताणे,उदालत जुमनाके, सतीश कालेकर,दिलीप दुधेवार,बंडुभाऊं पुसदेकर आदी गुरूदेव भजन मंडळ सदस्यांनी परिश्रम
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)