सुशील ओझा,झरी:– तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथील पंजा सवारीच्या बंगल्यातून संशयित चोरट्याने विविध साहित्य चोरले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. कमाल करत अवघ्या 24 तासांत मुद्देमालासह आरोपीस अटक केली.
12 ऑक्टोबर रोजी खरबडा येथून 4 किमी पूर्वेस असलेल्या शेतात सवारीचा बांगला आहे. आरोपीने बंगल्याची माहिती घेतली . शेख नुरू शेख मुस्तफा यांस मी सवारी घेऊन जातो असे पांढरकवडा येथील सलिम खान यासिन खान मणियार व राहुल कुनघाटकर रा. पांढरकवडा असे बोलले. नंतर निघून गेले.
दुसऱ्या दिवशी गावातील जब्बार नामक व्यक्तीची पत्नी ही शेतात आली. सवारीचे दर्शन घेण्याकरिता गेली असता सवारीची पेटी उघडी दिसली. पेटीतून धागे निघालेले दिसले. यावरून सदर महिलेला चोरी झाल्याची शंका आली. गावात जाऊन मुजावर विकास हनमंतु सोपरवार यांनी जाऊन तपासणी केली.
तेव्हा पितळी पंजा किंमत 20 हजार व एक किलोचा चांदीचा चंदनहार किंमत 40 हजार असा 60 हजारांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे आढळले. सवारीचे साहित्य चोरी जाताच खरबडा गावातील 40 ते 50 महिला पुरुष ठाण्यात धडकलेत. चोरीचे साहित्य व आरोपी यांस त्वरित अटक करा अशी मागणी केली. ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकरी परत गेलेत.
एक दिवसापूर्वी सलीम खान यासीम खान मणियार व राहुल कुनघटकर आले होते. सवारीचे दर्शन घेतो व सवारी घेऊन जातो असे बोलले होते. त्यावरून दोघांवर संशय आला. संशयितांविरोधात विलास हणमंतू सोपरवार रा. खरबडा यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी यावरून कलम 380, 34 नुसार गुन्हा दाखल केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. 24 तासांच्या आत आरोपी राहुल कुनघटकर याला अटक केली व संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. संपूर्ण कार्यवाही ठाणेदार अमोल बारापात्रे यांसह पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, जमादार श्यामसुंदर रायके, संदीप सोप्याम ,अंजुश वाकडे, अंकुश दरबसतेवार, शेख इरफान व आकाश नांनुरवार यांनी केली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)